महाराष्ट्रातील एकूण 35 जिल्ह्यांतील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा महासंग्राम सध्या सुरू आहे. अशात काल (गुरुवार, 15 डिसेंबर) रोजी लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली होती.
लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायतीचा प्रचार जोरात सुरु होता. अशात प्रचारसभेदरम्यान भाषण केल्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या अमर पुंडलिक नाडे यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. अमर नाडे यांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला, तसेच गावातील वातावरणही बदलून गेले. ( Man Dies Due To Heart Attack After Giving Speech In Election Rally Latur Murud Gram Panchayat Villagers Take Big Decision )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर आता एक अतिशय महत्वाची माहिती समोर येत आहे. या गावातील चौका-चौकात लागलेले सगळे बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. मृत अमर नाडे यांची पत्नी ह्या सरपंच पदाच्या उमेदवार असून त्यांना आता विरोधी पॅनलने देखील जाहीर पाठींबा दिला आहे. मुरुड ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता कोणीही प्रचारासाठी बाहेर पडताना दिसत नाही.
मुरुड ग्रामपंचायत ही लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. मुरुडमध्ये भरणारा गुराचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. अतिशय सशक्त आणि आर्थिकरित्या मजबूत असलेली 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत कायमच चर्चेत असते.
ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची असते. अशावेळी विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि गावातील सर्व बॅनर आणि प्रचार बंद केला, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
अधिक वाचा –
– वरसोली, देवळे, कुनेनामा गावात पोलिसांकडून रूट मार्च; भयमुक्त होऊन मतदान करण्याचे मतदारांना आवाहन
– इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ