मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवनमावळ विभागातील शिवणे येथील मंडल अधिकाऱ्याला लाच स्विकारताना अटक केली आहे. संगिता राजेंद्र शेरकर असे सदर महिला मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. ( Mandal Officer Arrested While Accepting Bribe Shivane Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली (ता मावळ) येथील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडळ अधिकारी संगिता शेरकर आणि आणखीन एक व्यक्ती संभाजी लोहर यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यावर शुक्रवारी त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर मंगळवार रोजी 20 हजार रुपयांची लाच मंडळ अधिकारी संगीता शेरकर यांनी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय येथे स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार पौर्णिमा, पोलीस शिपाई सौरभ, चालक-पोलीस हवालदार दीपक दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : ‘स्वतःला भाई समजत असाल, तर..’, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज, वाचा
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे जिल्ह्यासाठी मोठा निर्णय!