मावळ तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने आज (सोमवार, दिनांक 24 जुलै) तहसीलदार कार्यालय, वडगाव मावळ इथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मावळ तालुका काँग्रेस (आय) पेटून उठली असून लवकरात लवकर मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करावेत यासाठीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. ( Manipur Violence And Crime Viral Video Congress party Marched To Tehsil Office In Maval Taluka )
मावळ तालुक्याचे अध्यक्ष यशवंत मोहोळ तसेच महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, मावळ लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघुले यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यात केंद्र सरकार विरोधात प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून महिला व विद्यार्थीनींना संरक्षण देण्यात केंद्र सरकार अपयशी पडल्याची भावना मावळ काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया व अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालय मध्ये झालेल्या सभेमध्ये प्रक्षोभ व्यक्त केला. सदर मोर्चा मध्ये मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले, मावळ महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, मावळ युवक अध्यक्ष राजेश वाघुले, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रांतिक सचिव निखिल कवीश्वर, मावळ लीगल सेलचे अध्यक्ष, ऍड खंडू तिकोणे, तालुका प्रवक्ता मिलिंद अच्युत, तळेगाव युवक अध्यक्ष समीर दाभाडे, विशाल वाळूंज, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष पवन गायकवाड, सेवा दल अध्यक्ष असलम शेख, देहूरोड शहराध्यक्ष मलिक शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील आठवड्यात सोशल मीडियावर मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याचे दिसत होते, तसेच त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभर संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर ही घटना ताजी असताना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. एकंदरीत महिला अत्याचाराच्या या घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.
अधिक वाचा –
– ‘पसायदान विश्व दीप कृती समिती’च्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर, काय आहे ही समिती? जाणून घ्या
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनकडून कोथूर्णे इथे आदिवासी समाजातील 50 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीटचे वाटप