Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे मावळचे आमदार सुनील शेळके यांचे शिलेदार आणि विश्वासू सहकारी प्रशांत भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड आनंदाने सहभाग नोंदवला.
वराळे गावात या कार्यक्रमाला अस्मिता निलेश मराठे (ग्रा.प. सदस्य), सीमा विकास मराठे (ग्रा.प. सदस्य), अनिता रामदास मराठे (अध्यक्ष), साक्षी राजू मराठे (युवती अध्यक्ष), ऋतुजा अतुल मराठे, माधुरी विशाल मराठे, तनुजा संतोष मराठे, सरीखा माऊली मराठे, दिपाली गणेश मराठे, अश्विनी विवेक शिंदे, सोनाली निलेश मराठे, अमृता प्रवीण मराठे, रुपाली सुरेश मराठे, वैशाली तानाजी मराठे, रूपाली राहुल मराठे यांच्यासह परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर आंबी गावातील कार्यक्रमाला बाळासाहेब घोजगे, भानुदास दरेकर, भरत घोजगे, नामदेव दरेकर, प्रकाश घोजगे, राहुल बनसोडे, प्रदीप बनसोडे, संभाजी घोजगे, किसन घोजगे, लक्ष्मण घोजगे, सुरज घोजगे, विजय दरेकर, समीर घोजगे, अक्षय बनसोडे, संजय साहेबराव पिंगळे, नारायण घोजगे, किरण काशिनाथ घोजगे, लक्ष्मण बनसोडे, अमर घोजगे, सुनील घोजगे, रुपेश पिंजन, ऋतिक घोजगे, तुषार घोजगे, साईल घोजगे, दत्तात्रय घोजगे, राजू बनसोडे, मंगेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भर पावसातही महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले. “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता महिलांचा प्रशांतदादा भागवत यांना प्रचंड पाठिंबा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत दादा भागवत हे आमदार सुनील शेळके यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
गावोगावी होणारे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, महिलांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा संपर्क थेट जनतेशी वाढत असून राजकीय वर्तुळात त्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
“मनोरंजन संध्या २०२५” च्या माध्यमातून प्रशांतदादा भागवत यांनी महिलांच्या मनात आपुलकी, विश्वास आणि जिव्हाळा निर्माण केला असून या उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची ठसा उमटत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल