प्रसिद्ध मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (शनिवार, 18 मार्च) रोजी कोल्हापुरात दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी सिनेमांत अजरामर भुमिका साकारुन महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ( Marathi Actor Bhalchandra Kulkarni Passed Away At Age 88 In His Kolhapur Residence On Saturday 18th March )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. भूमिका कोणतीही असली तरीही ती अतिशय परफेक्ट करण्यात त्यांचा हातखंडा होता. पिंजरा, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, थरथराट, जावयाची जात, धुमधडाका अशा तब्बल 300 हून अधिक सिनेमात भालचंद्र कुलकर्णी यांनी काम केले होते. कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजलीॐ शांती pic.twitter.com/RcWUVv8NyI
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 18, 2023
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते काही वर्षे सचिव तर काही वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी 6 वाजता निधन झाले असून दुपारी 12 वाजता कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा –
– ‘प्रशासकीय सेवांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक असले पाहिजेत’, समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न
– महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू