मावळ तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा कान्हे येथे मंगळवारी (दि. 27) अत्यंत उत्साहात मराठी भाषा गौरव दिन ( Marathi Bhasha Gaurav Din ) साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून विविध कार्यक्रमान्वये माय मराठीचा जागर अतिशय करण्यात आला. मंगळवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात मराठी भाषा गौरव दिन शाळेच्या प्रांगणात अत्यंत सुंदर नियोजनने साजरा करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कार्यक्रमाचे नियोजन आणि नृत्य दिग्दर्शन संगीता मधे यांनी केले होते. सहशिक्षिका सुनिता देशमुख यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर काढलेल्या सुंदर रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. शाळेचा परिपाठ झाल्यानंतर ज्येष्ठ कवी तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत “मराठी भाषा गौरव दिन” साजरा केला. ( Marathi Language Pride Day celebrated with enthusiasm at ZP School Kanhe Maval taluka )
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करत आणि नृत्य सादरीकरण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला ढोरे यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनींना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी फलकलेखन दादासाहेब खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्कृष्ट वक्ते जिजाराम काळडोके यांनी केले. यासह सविता क्षीरसागर, अक्षता आंबरुळे, शारदा घोडे, ढगे मॅडम यांनीही विशेष परिश्रम घेतले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
– इनरव्हील क्लब तर्फे तळेगाव दाभाडे शहरात 100 विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी । Talegaon Dabhade
– अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session