Dainik Maval News : बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्यात गांजा विक्री प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जण अटकेत आहेत.
१. ओंमकार हरी इंगवले (वय २५ वर्षे, रा. अक्षय रेसिडेन्सी, म्हेत्रेवस्ती, कृष्णानगर, चिखली), २. आयुष राजेंद्र भट (वय २५ वर्षे, रा. शिवतेजनगर, चिखली) आणि ३. किशोर (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पहिल्या दोन्ही आरोपीस अटक केली असून क्रमांक तीनच्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रदिप गोरक्षनाथ गोंडाबे (वय ४० वर्षे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपींवर देहूरोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २० ( ब ) (ii) (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्र १ आणि २ यांच्या ताब्यात २१.३३ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ४ लाख ५ हजार ९६६ रुपये किंमतीचा अंमली पदार्थ आरोपी क्रमांक ३ याचेकडून विकत घेवून बेकायदेशिररित्या विक्रीकरीता कब्जात बाळगताना मिळुन आला. पोउपनि राठोड हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी
