भाजपा लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून बाळा भेगडे हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान लोकसभा प्रवास योजना पश्चिम महाराष्ट्राच्या संघटनात्मक दौऱ्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन केली. ( Maval BJP Bala Bhegade Meet Udayanraje Bhosale And Shivendra Raje Bhosale At Satara )
उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस निवासस्थानी बाळा भेगडेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा प्रवास योजनेच्या प्रदेश प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल उदयनराजेंनी यावेळी भेगडे यांचे अभिनंदन केले. तसेच विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर यावेळी चर्चा झाली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही घेतली भेट….
खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच माजी मंत्री बाळा भेगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भारतीय जनता पक्षाचे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही लोकसभा प्रवास योजनेच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्ताने सातारा येथील निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.
हेही वाचा – ‘आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं..’, माजी आमदारांचा आजी आमदारांवर निशाणा I Maval Politics
बाळा भेगडे यांच्या दौऱ्याचे नियोजन…
सातारा (8नोव्हेंबर)
माढा
हातकणंगले (9 नोव्हेंबर)
कोल्हापूर
रत्नागिरी (10 नोव्हेंबर)
सिंधुदुर्ग
अधिक वाचा –