वडगाव नगरपंचायतीच्या वतीने वडगाव नगरपंचायत क्षेत्रातील वय वर्ष 9 ते 20 या वयोगटातील विद्यार्थिनींसाठी मावळ दुर्गा अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मुलींना स्वसंरक्षणासाठी तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी याबाबत माहिती दिली. ( Maval Durga Abhiyan by Vadgaon Nagar Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अभियान महिला व बालकल्याण निधी अंतर्गंत राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत शिवकालीन मैदानी खेळ, कराटे आदींचा समावेश असणार आहे. नगरपंचायत हद्दीतील विद्यार्थिनी, मुलींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. इच्छुकांनी आधार कार्ड, रहिवाशी दाखला, शिधा पत्रिका झेरॉक्स आणि डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र या कागद पत्रांसह 17 फेब्रुवारीपर्यंत नगरपंचायत कार्यालयात प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा वहिले यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी बाळा भेगडे भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर, वाचा
– बंद दाराचे कुलूप तोडून चोरी, किवळे-देहूरोड येथील घरफोडीत सोने-चांदीचे दागिने लंपास