व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री डोळसनाथ महाराजांचे दर्शन घेऊन अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ । Bapu Bhegade

यावेळी कार्यकर्त्यांनी बापूसाहेब भेगडे आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 4, 2024
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Independent candidate Bapusaheb Bhegde started campaign by visiting Shri Dolasnath Maharaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा, मनसे यांचा पाठिंबा असलेले जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांना अभिषेक करून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बापूसाहेब भेगडे आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले होते.

यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना बापूसाहेब भेगडे यांनी आपले व्हिजन बोलून दाखविले. त्यांनी सांगितले, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर साकारात असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज भव्य मंदिराचा आराखडा मंजूर करून त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी बांधवांसाठी सोलरच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करून मोफत वीज देण्याचा प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. बेरोजगारांना मावळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये काम देऊन बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार आहे. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांनीही आनंदी जीवन जगले पाहिजे, या हेतूने सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महिलांसाठी विशेष उपक्रम राबविणार आहोत. महिलांमध्ये कौशल्य प्राप्त होण्यासाठी पाच एकरमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मावळ तालुका भयमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी आपण बहुमतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहनही बापूसाहेब भेगडे यांनी यावेळी केले.

माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले, की मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याला प्रथम प्राधान्य असणार आहे. नामांकित कंपन्यामध्ये स्थानिक युवक युवतींना सामावून घेऊन त्यांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, मावळ तालुक्यातील मतदारांचा पाठिंबा आहे. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली असल्याने बापूसाहेब भेगडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बापूसाहेब भेगडे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, या घोषणांनी श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यासह माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, राजाराम शिंदे, बबनराव भेगडे, सुभाष जाधव, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, रवींद्रआप्पा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, गुलाबराव वरघडे, गिरीश खेर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर ;

माजी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत ढोरे, राजेश मुऱ्हे, सुनील वरघडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक काळोखे, मनोहर दिगंबर भेगडे,माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, मावळ तालुका राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका संस्थापक अध्यक्षा सारिका भेगडे, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, मायाताई भेगडे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष भेगडे, आशिष खांडगे, माजी नगरसेवक अरुण भेगडे पाटील, प्रकाश ओसवाल, अरुण माने, माजी नगरसेविका मंगलताई जाधव, संध्याताई भेगडे, ॲड. रुपालीताई दाभाडे, माजी उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, रत्नाताई भेगडे, भवरलाल ओसवाल, बाळतात्या भेगडे, रवींद्र माने, अजय भेगडे, बाळासाहेब सातकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval


Previous Post

तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो – वाचा आमदार सुनिल शेळके यांच्या भाषणातील संपूर्ण मुद्दे

Next Post

निवडणूक खर्च तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष, मावळ मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व्यवस्था । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Assembly Elections Announced

निवडणूक खर्च तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष, मावळ मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व्यवस्था । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.