Dainik Maval News : मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ आणि वाद ही मालिका काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतीच मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु ही घोषणा होताच या निवडीवर व निवडणूक प्रतिक्रियेवर आक्षेप घेत तक्रार अर्ज करण्यात आला आहे.
मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज बाद केलेल्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठाविण्याचा मार्ग अवलंबविण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मर्या., वडगाव मावळ यांना पत्र दिले असून त्याची प्रत सहकार आयुक्त राज्य, सहकार आयुक्त जिल्हा व सहकार मंत्री यांना पाठविली आहे.
- खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत सहकार नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे सांगत योग्य प्रक्रिया न राबवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अर्जावर सोमनाथ बबन कोंडे, विशाल वसंतराव वहिले, संजय रामदास वाजे यांच्या सह्या आहेत.
काय आहे आक्षेप ?
‘मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी खादी ग्रामोद्योग संघ मर्यादित निवडणूक प्रक्रियेसाठी अर्ज काही नामंजूर केलेले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने म्हणजेच निवडणूक अधिकारी यांनी प्रथम अर्ज नामंजूर केले व तदनंतर तेच अर्ज मंजूर करण्यात आले. याबाबत सर्व निवडणूक प्रक्रिया संदर्भात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. तसेच खादी ग्राम उद्योग संघ आणि निवडणूक प्रक्रिया संदर्भात सर्व नियमावली लावणी आवश्यक आहे. या संस्थेने जवळजवळ गेली दहा वर्ष कर्ज वितरण केलेले नाही. या संस्थेने कर्जवाटप बाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा घेणे बाबत देखील निकष पुढे आलेले आहेत. खादी ग्रामोद्योग संघानी सदस्य संख्या वाढी संदर्भात अर्ज न देणे अर्थात ही संस्था सहकारी आहे का? स्वायत्त आहे. याबाबत देखील खुलासा करणे अनिवार्य आहे. याबाबत सर्व खादी ग्राम उद्योग संघाची एकमेव मागणी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवावी सर्व निवडणूक प्रक्रियेचे निकष अधोरेखित करणे नंतरच अर्ज मागवून घेणे सर्व अर्जाची छाननी प्रक्रिये संदर्भात संविधानिक कार्यपद्धती व शासनाचे नियमांचे पालन व्हावे.’ अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच