Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. 20) मतदान पार पडले. मावळ मतदारसंघातील 402 मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान संपन्न झाले. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. परंतु लोणावळा व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्याने उशीरापर्यंत मतदान सुरु राहिले. अखेर रात्री उशीरा पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळात 72.10 टक्के मतदान झाले.
मावळात, बुधवारी सकाळी 7 ते दुपारी 6 व नंतर काही वेळ झालेल्या एकूण मतदानात मतदारांमध्ये चांगला उत्साहा पाहायला मिळाला. रात्री उशीरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळ विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार संख्या 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 44 हजार 16 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर 1 लाख 34 हजार 414 महिला मतदारांनी मतदान केले. इतर दोन मतदार सहित एकूण 2 लाख 78 हजार 432 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मावळात 72.10 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून रात्री उशिरा सांगण्यात आले. परंतु मतदानाची अंतिम आकडेवारी ही आज गुरुवारी (दि.21) दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त आहे. गतवेळी पेक्षा अर्थात 2019 पेक्षा यंदा 30 हजार 469 अधिकचे मतदान झाले असून या विक्रमी मतदानाचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला फटका बसणार याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha
– मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी