मावळ लोकसभेसाठी भारत राष्ट्र समिती पक्षाने ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांना पाठींबा जाहीर केला आहे. शिवाजीराव जाधव हे फॉरवर्ड ब्लॉकचे 33-मावळ लोकसभाचे उमेदवार असून ते उच्चशिक्षित उमेदवार असल्याने त्यांना बीआरएसने पाठींबा जाहीर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवाजीराव जाधव यांनी यूनियन लीडर म्हणुन 23 वर्षे राष्ट्रीय स्तरावर काम पाहिले आहे. तसेच जाधव यांनी त्यांच्या कारकिर्दीत साडेतीन हजारहून अधिक लोकांना नोकरी मिळवून दिली आहे. तर, 700 हून अधिक लोकांवरचे जुलमी निलंबन मागे घ्यायला लावले, अशा समाजासाठी झटणाऱ्या उमेदवारापाठीमागे उभे राहिले पाहिजे, असे सांगत बीआरएस पक्षाने हा पाठींबा जाहीर केला. ( Maval Lok Sabha BRS party announced its support to Shivajirao Jadhav candidate of All India Forward Block Party )
वास्तवाचे भान आणि समाजाच्या समस्यांची जाणीव ही शिवाजीराव जाधव यांची वैशिष्ट्ये त्यांना इतर उमेदवारापेक्षा वेगळे करतात. सध्या ते 350 कोटी टर्नओव्हर असलेल्या पतपेढीचे यशस्वी व्यवस्थापकीय संचालक आहेत. दीड लाखाहून अधिक सभासद या पतपेढी मध्ये जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे शेकापट्याही काही नेत्यांचा शिवाजी जाधव यांना पाठींबा आहे.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बुदीती राजशेखर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती । Maval Lok Sabha
– पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती । Pune Lok Sabha
– ईव्हीएमबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘तो मेसेज…’