अल्पावधीतच रायगड जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्वाला आपल्या कार्याची दखल घ्यायला लावलेल्या आणि सामान्य जनतेच्या पसंतीस उतरलेल्या, मावळ लोकसभेच्या भावी खासदार म्हणून चर्चेत असलेल्या माधवी नरेश जोशी यांनी नुकताच चौक परिसरात कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवून सर्वांनाच अचंबित केले. यानंतर आता संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ज्यांना 60 टक्क्यांहून अधिक गुण आहेत, अशा सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करून रोख बक्षीस देण्याचे माधवी जोशी यांनी जाहीर केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जिथे-जिथे गरजवंत आहे, तिथे-तिथे मदतीला गरीबांची माऊली बनून माधवी जोशी धावत आहेत. नुकतीच माधवी जोशी यांनी कर्जत तालुक्यातील पळसदरी वाडी येथील रस्ते अपघातात मृत पावलेल्या सारिका रामदास पिरकड या मुलीच्या परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करत त्यांना आर्थिक मदत देखील केली. इतकेच नाही तर या कुटुंबातील दुसऱ्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. ही माहिती समाजमाध्यमांद्वारे आता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली असून त्यांच्यावर कौतूकाचा आणि आभाराचा वर्षाव होतो आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि सोडवण्याठी या मतदारसंघातील खासदार होणे काळाची गरज असल्याचे माधवी जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( maval lok sabha constituency mp candidate madhavi naresh joshi from raigad dist )
“गेली कित्येक वर्ष रखडलेला पनवेल-कर्जत-भिमाशंकर रस्ता, पाली-भुतिवली डॅम अस्तित्वात असून सुध्दा कर्जत तालुक्यातील जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल, कोंढाणा धरणाचा लटकलेला प्रश्न, कर्जत स्टेशनला न मिळणारा मेल एक्सप्रेस गाड्यांचा थांबा…” असे अनेक प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे माध्यमातून सोडवण्याची प्राथमिकता असल्याचे माधवी जोशी यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासाबाबत मोठी अपडेट! पोलिस आयुक्तांकडून आणखी एका विशेष पथकाची स्थापना
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष