लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मंगळवारी (दि. 4 जून) सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीनंतर रात्री उशीरापर्यंत देशातील संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. यात नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले, तर राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीनेही मोठी मुसंडी मारली. महाराष्ट्रात जनमताचा कौल हा महाविकासआघाडीच्या बाजूने राहिला. परंतू ज्या मतदारसंघात महायुतीची जादू चालली, त्यापैकी एक होता तो मावळ लोकसभा मतदारसंघ. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळात श्रीरंग बारणेंनी आपल्या ऐतिहासिक विजयासह खासदारकीची हॅटट्रीक केली आहे. परंतू त्यांना त्यांच्या महाविकासआघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांनी चांगलीच झुंज दिली. काही विधानसभा मतदारसंघात संजोग वाघेरे यांनी लीड घेतली. परंतू प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपले मतांचे दान भरभरून बारणेंच्या ओंझळीत टाकल्याने बारणेंचा विजय सोपा झाला.
हेही वाचा – अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर
मावळ लोकसभेचा विधानसभा निहाय निकाल ;
पनवेल विधानसभा मतदारसंघ
श्रीरंग बारणे – 1 लाख 50 हजार 924
संजोग वाघेरे – 1 लाख 19 हजार 886
बारणे आघाडी – 31 हजार 38
कर्जत विधानसभा
श्रीरंग बारणे – 75 हजार 534
संजोग वाघेरे – 93 हजार 194
वाघेरे आघाडी – 17 हजार 660
उरण विधानसभा
श्रीरंग बारणे – 91 हजार 285
संजोग वाघेरे – 1 लाख 4 हजार 535
वाघेरे आघाडी – 13 हजार 250
मावळ विधानसभा
श्रीरंग बारणे – 94 हजार 800
संजोग वाघेरे – 89 हजार 835
बारणे आघाडी – 4935
चिंचवड विधानसभा
श्रीरंग बारणे – 1 लाख 86 हजार 235
संजोग वाघेरे – 1 लाख 11 हजार 470
बारणे आघाडी – 74 हजार 765
पिंपरी विधानसभा
श्रीरंग बारणे – 93 हजार 323
संजोग वाघेरे – 76 हजार 592
बारणे आघाडी – 16 हजार 731
( Maval Lok Sabha Election 2024 Result Assembly constituency wise statistics Shrirang Barane wins )
अधिक वाचा –
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर
– मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत
– मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins