लोकसभांचे निकाल जाहीर झाले आहेत. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झाले आहेत. श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा मावळ लोकसभेतून विजयी झाले आहेत. त्यांनी खासदारकीची हॅटट्रीक साधली आहे. काल (दि. 4 जून) जेव्हा 50 हजारांची आघाडी घेतली होती, तेव्हाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती. विजय हा विजय असतो, परंतू विजयाचं विश्लेषण केल्यास त्याची कारणमिमांसा केल्यास अनेक पैलू समोर येतात. बारणेंना मिळालेली मते पाहता आणि विधानसभा निहायआकडेवारी पाहता मावळ विधानसभेत महायुतीचा बार फुसका निघाल्याचे स्पष्ट होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बारणेंना मावळात नाममात्र आघाडी –
मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ विधानसभा क्षेत्रात महायुतीची ताकद ही कागदावर मोठी दिसत होती. परंतू ही ताकद जितकी कागदावर दिसत होती, तितकी प्रत्यक्षात दिसून आली नाही. आजी माजी आमदार, अनेक दिग्गज सोबत असतानाही मावळ विधानसभेत बारणेंना अवघी 4935 मतांची आघाडी मिळाली. मावळ विधानसभेत श्रीरंग बारणे यांना एकूण 94 हजार 800 मते मिळाली, तर संजोग वाघेरे यांना 89 हजार 835 मते मिळाली. बारणेंना येथे नाममात्र आघाडी अर्थात 4935 मते अधिकची मिळाल्याचे दिसत आहे.
कार्यकर्त्यांना गृहित धरणे महायुतीच्या नेत्यांना भोवले –
मावळ विधानसभेचे राजकारण हे मावळ लोकसभेचा निकाल समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मावळ विधानसभा हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथे सर्वात आधी बारणेंच्या उमेदवारीला विरोध झाला होता. मावळातील आज माजी आमदार हे महायुतीत होते, आहेत. परंतू त्यांनी सुरुवातीपासूनच बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. आमदार सुनिल शेळके यांनी तर बारणेंच्या विरोधात अगदी रान पेटवले होते, असेच चित्र सुरूवातीला होते. त्यामुळे आपसुकत राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या मनात बारणेंच्या बद्दल नाराजी रुजली गेली. ( Maval Lok Sabha Election 2024 Result Shrirang Barane wins Maval Vidhansabha statistics )
दुसरीकडे भाजपाचे बाळा भेगडे यांच्या उमेदवारीसाठी तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड विरोध केला होता. इतकेच नाही तर भाजपा कार्यकर्त्यांनी बारणेंना मत करण्यापेक्षा नोटाला मतदान करण्याचा इशारा दिला होता. जरी आता मावळ लोकसभेत नोटाला एकूण 16 हजार 760 मतं पडली असली, तरीही ही भाजपा कार्यकर्त्यांची होती, असे कुणीही म्हणू शकत नाही. परंतू भाजपा आणि राष्ट्रवादीच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांचा किंवा नाराज कार्यकर्त्यांचा फटका बारणेंना मावळात बसला हे दिसत आहे. आणि कार्यकर्त्यांना गृहित धरणे मावळ विधानसभेतील महायुतीच्या नेत्यांना चांगलेच भोवल्याचेही दिसत आहे.
अधिक वाचा –
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर