मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराची आज (दि. 11) सांगता होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी मतदारांना आवाहन केले आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार सुनिल शेळके यांनी मावळच्या जनतेला साद घातली आहे. महायुतीला साथ देईल त्या गावाला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी माझी, अशी साद मावळवासियांना आमदार शेळकेंनी घातली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळकेंची विकासाच्या मुद्द्यावरुन मावळकरांना साद –
“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांना मावळ तालुक्यातुन विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीचे सर्व नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय आहेत.मा.नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.मावळच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आजपर्यंत चोवीसशे कोटींपेक्षा अधिकचा निधी मिळाला आहे. भविष्यकाळात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना, केंद्राशी संबंधित प्रकल्पांना अधिक निधी मिळवायचा असेल तर आपल्या विचारांचा खासदार दिल्लीत असायला हवा.”
“मावळ तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, त्यामुळे तालुक्याचं हित पाहून आपण श्रीरंग आप्पांना धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करावं. कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका,कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला तालुक्याचे भवितव्य विकासकामांतून उभे करायचे आहे.आप्पांना पुन्हा काम करण्याची संधी देण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन माझ्या मावळच्या मायबाप जनतेला, माता-भगिनींना, तरुण सहकाऱ्यांना करतो.” ( Maval Lok Sabha Election MLA Sunil Shelke appeal for Shrirang Barane )
अधिक वाचा –
– ‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha