‘महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने व एकदिलाने फक्त ‘धनुष्यबाण’ चिन्ह चालविण्यात येईल,’ असा निर्वाळा मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी (दि. 16) दिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रसे – मनसे – आरपीआय – रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत जवळ नायगाव येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा संपन्न झाला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या मेळाव्यात एकमेकांवर मिश्किल शेरेबाजी करत महायुतीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी उमेदवार श्रीरंग बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. ( Maval Lok Sabha Mahayuti Rally At Kamshet NCP MLA Sunil Shelke Speech For Shrirang Barne )
- आमदार सुनिल शेळके यांनी देखील यावेळी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करत सभा गाजवली. ‘ही महायुती टीकावी, अशी देवाकडे प्रार्थना करतो. कारण पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल, ते माहिती नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले आणि व्यासपीठावर एकच हशा पिकला.
माझ्यापेक्षाही बारणेंना जास्त मताधिक्य मिळेल – सुनिल शेळके
‘गेल्या पाच वर्षात जेवढी राजकीय स्थित्यंतरे अनुभवली तेवढी इतरांनी 50 वर्षांत अनुभवली नसतील,’ असे सांगत ते म्हणाले की, ‘अनेक नाट्यपूर्ण राजकीय उलथापालथी झाल्याने कधी विरोधात, कधी सत्तेत, कधी बरोबर, कधी बाजूला अशा वेळोवेळी भूमिका बदलाव्या लागल्या. हे सर्व करीत असताना मावळचा विकास या एकाच मुद्द्यासाठी आम्ही तडजोडी केल्या. मानापमान सहन केला. तालुक्याला न्याय देईल, विकास करेल त्यालाच पाठिंबा, एवढीच आपली भूमिका असते. तालुक्याला दोन-अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या नेत्याशी इमान राखणे आवश्यक आहे. अजितदादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे मावळात बारणे यांना आपल्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळेल,’ अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.
श्रीरंग आप्पा बारणे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा एवढीच माझी मागणी होती, त्याप्रमाणे त्यांनी तो दिला आहे. त्यामुळे आता कोणतीही तक्रार उरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade
– ‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha
– हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News