व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारपासून (१८ एप्रिल) भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८ तर पनवलेमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५ मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार ३२३ मतदार आहेत. निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ मतदारसंघातील पिंपरीत तीन लाख ६४ हजार ८०६, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८, मावळमध्ये तीन लाख ६९ हजार ५३४ तर पनवेलमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५, कर्जत तीन लाख चार ५२३ आणि उरणमध्ये तीन लाख नऊ हजार २७५ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील १३ लाख २९ हजार ७४८ तर पनवेल, कर्जत, उरणमधील ११ लाख ७९ हजार ७१३ मतदार असून, पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख ५० हजार जास्त मतदार आहेत. तर, १३ लाख १० हजार ४३४ पुरुष तर ११ लाख ९८ हजार ८६८ महिला आणि इतर १५९ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. २४ हजार २७८ नवमतदार असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे २२ हजार ३८० तर शंभरपेक्षा जास्त वय असणारे एक हजार ३५८ मतदार आहेत. दोन हजार ५६२ मतदान केंद्र आहेत. त्यात शहरी एक हजार ६९१ तर ग्रामीण भागात ८७१ केंद्र आहेत.

  • प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला, युवक, दिव्यांग यांच्याद्वारे संचलित एक, आदर्श सहा असे एकूण २४ विशेष मतदान केंद्र असणार आहेत. तीन हजार ५९४ मतदान यंत्र तर तीन हजार ८१९ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. मतदानाच्या दिवशी एक हजार २८१ पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत दोन लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आचारसंहिता भंगाच्या ५० तक्रारी निकाली काढल्या आहेत. मतदारांना उन्हात उभे राहू लागू नये यासाठी मंडप टाकण्यात येणार आहे. पाण्याची सोय केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान केंद्रात घेतले जाईल. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. ( Voter Of Chinchwad and Panvel will decide new MP of Maval Lok Sabha Constituency )

अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश । Pune News
– आमदार सुनिल शेळके यांच्या आजी लक्ष्मीबाई शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन । Talegaon Dabhade
– ‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

‘देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी… पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही’ – आमदार सुनिल शेळके

Next Post

मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI-India

मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.