व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारणे यांनी रविवारी प्रथमच मावळ तालुक्यात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
mp-shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. 31) मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, भाजपचे मावळ तालुका प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मावळच्या आजी-माजी आमदारांनी श्रीरंग बारणे यांना तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारणे यांनी रविवारी प्रथमच मावळ तालुक्यात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. सर्व ठिकाणी बारणे यांचे उस्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकदिलाने व मेहनतीने काम करून बारणे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचा निर्धार केला. ( Maval Lok Sabha MP Shrirang Barne met MLA Sunil Shelke BJP Bala Bhegde and Ravindra Bhegade )

भाजपचे मावळ विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, संघटन मंत्री रवींद्र देशपांडे, बैलगाडा मालक संघटनेचे अण्णासाहेब भेगडे, मनोहर भेगडे, रघुवीर शेलार, संतोष दाभाडे, राजेंद्र जांभुळकर, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, राजेंद्र तरस, सुनील मोरे, संजय वाडेकर, वैभव कोतुळकर, अनंत चंद्रचूड, संदीप सोमवंशी, शुभम सातकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यापूर्वी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे व मेहनतीमुळे आपण चांगल्या मतांनी विजयी झालो, असे नमूद करून या निवडणुकीतही सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे लोकसभेत काही काळ विरोधात बसावे लागले, मात्र त्या काळातही आपण कधीच भाजपच्या विरोधात बोललो नाही. कधीही चुकीचे काम केले नाही आणि करणारही नाही, असे बारणे यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना उपस्थित नेते व कार्यकर्ते यांनी श्रीरंग बारणे यांना मावळ तालुक्यातून ‘रेकॉर्ड ब्रेक’ मते मिळवून देण्याचा निर्धार केला. ‘खासदार बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधीही मिळेल,’ असा विश्वास रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार मोहिमेसाठी काँग्रेसकडून मावळ विधानसभेत समन्वय समिती स्थापन, पाहा संपूर्ण यादी
– शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी
– लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात


Previous Post

‘थकीत कर भरा… नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू’, थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade

Next Post

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
LPG-Gas

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.