व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार मोहिमेसाठी काँग्रेसकडून मावळ विधानसभेत समन्वय समिती स्थापन, पाहा संपूर्ण यादी

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार सभा आणि प्रचार मोहिमेत काँग्रेस पक्षाच्या सहभागासाठी काँग्रेसकडून विधानसभानिहाय समन्वय समिती स्थापण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 31, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Sanjog-Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत. आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार सभा आणि प्रचार मोहिमेत काँग्रेस पक्षाच्या सहभागासाठी काँग्रेसकडून विधानसभानिहाय समन्वय समिती स्थापण्यात आली आहे. मावळ विधानसभेची पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आलीये. पुणे येथील काँग्रेस भवनामध्ये मावळ विधानसभेचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक कौस्तुभ गुजर, खजिनदार बापूसाहेब ढमढेरे, संग्राम मोहोळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ‘आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अर्थात महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे करावा आणि स्वतःला झोकून देऊन वाघेरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे,’ असे आवाहन जिल्हाध्यक्ष जगताप यांनी यावेळी केले. ( Congress Formed Coordination Committee In Maval Lok Sabha For Campaign Of Candidate Sanjog Waghere )

मावळ लोकसभा मतदार संघासाठी, मावळ विधानसभेची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. त्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांच्यावर मावळ लोकसभेचे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्यावर विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली. यासह महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, युवक अध्यक्ष राजेश वाघोले, देहूरोड ब्लॉक अध्यक्ष हाजी मलंग मारेमत्तू, प्रमोद गायकवाड, दिलीप ढमाले, राजीव फलके, प्रतिमा हिरे, माऊली काळोखे, तळेगाव स्टेशन अध्यक्ष योगेश पारगे, माजी उपनगराध्यक्ष लोणावळा राजीव गवळी यांच्यावर देखील समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात
– महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात
– समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar

Next Post

उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
barne-shelke-bhegade

उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.