व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे प्रथमच मावळात; आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे यांची घेतली भेट

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारणे यांनी आज (रविवारी) प्रथमच मावळ तालुक्यात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 31, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
barne-shelke-bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (31 मार्च) मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, भाजपचे मावळ तालुका प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मावळच्या आजी-माजी आमदारांनी श्रीरंग बारणे यांना तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारणे यांनी आज (रविवारी) प्रथमच मावळ तालुक्यात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. सर्व ठिकाणी बारणे यांचे उस्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकदिलाने व मेहनतीने काम करून बारणे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचा निर्धार केला. ( Maval Lok Sabha MP Shrirang Barne met MLA Sunil Shelke and Bala Bhegde )

  • आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली. त्यावेळी आमदारांचे वडील शंकरराव शेळके व परिवारातील सदस्य उपस्थित होते. शेळके परिवाराच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर बारणे यांनी आमदार शेळके यांच्याशी तालुक्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. तालुक्यात राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असल्याने बारणे यांना तालुक्यात विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास शेळके यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी देखील खासदार बारणे यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. त्यावेळी बाळा भेगडे यांचे बंधू विकास भेगडे व परिवारातील सदस्य, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, शंकरराव शिंदे, शिवसेनेचे राजेंद्र तरस, सुनील तथा मुन्ना मोरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच 400 हून अधिक खासदार निवडून आणण्याचा भाजपचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, अशी ग्वाही बाळा भेगडे यांनी दिली.

भाजपचे मावळ विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, संघटन मंत्री रवींद्र देशपांडे, बैलगाडा मालक संघटनेचे अण्णासाहेब भेगडे, मनोहर भेगडे, रघुवीर शेलार, संतोष दाभाडे, राजेंद्र जांभुळकर, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, राजेंद्र तरस, सुनील मोरे, संजय वाडेकर, वैभव कोतुळकर, अनंत चंद्रचूड, संदीप सोमवंशी, शुभम सातकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी
– लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात
– महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचार मोहिमेसाठी काँग्रेसकडून मावळ विधानसभेत समन्वय समिती स्थापन, पाहा संपूर्ण यादी

Next Post

‘थकीत कर भरा… नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू’, थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

'थकीत कर भरा... नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू', थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.