मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा 96 हजारहून अधिकच्या फरकाने पराभव केला. बारणेंचा हा विजय ऐतिहासिक आहे. मावळात कुठल्याही लोक प्रतिनिधीनी केलेली ही पहिलीच हॅटट्रीक आहे. त्यामुळे श्रीरंग बारणेंच्या खासदारकीच्या हॅटट्रीकमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. विजयानंतर बारणेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘हा विजय माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे,’ असे म्हटले होते. तसेच सलग तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी माझे हितचिंतक, सल्लागार, माझे तळागाळातील सर्व कार्यकर्ते आणि माझे माय – बाप मतदार या सर्वांचे खुप खुप आभार, त्यांनी मानले आहे. ही हॅट्रिक फक्त आपली नाही तर ही हॅट्रिक मावळच्या विकासाची असल्याचे बारणे म्हणाले.
विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया –
“तुमच्या या विश्वासामुळे सलग तिसऱ्यांदा मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि मावळ्यांच्या साथीमुळे आता मी लोकशाहीच्या मंदिरात दाणार आहे. हा केवळ शिवसेनेचा नव्हे तर हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय आहे.”
“गेल्या 10 वर्षांपासून मी अविरतपणे आपल्या मावळसाठी झटत आहे. आता यापुढेही मी मावळला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी माझा हा संघर्ष अखंड सुरु राहणार आहे. मायबाप बंधू – भगिनींचे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. शिवसेना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व विजयी उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन !”
पुन्हा नवी उमेद आणि नवी ऊर्जा घेऊन मावळचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी लाखोंच्या लीडने विजयी केल्याबद्दल मावळकरांचे खुप खुप आभार, अशा शब्दांत बारणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ( Maval Lok Sabha Result 2024 Shiv Sena Shrirang Barane win said thanks to voters )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result