व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“मतदारांचा कौल मान्य, निवडणूकीत जय-पराजय होतात, पण..”, मावळ लोकसभेतील पराभवानंतर संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया, वाचा

लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Sanjog-Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली. मात्र, अंतिम निकाल समोर आला तेव्हा महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा तब्बल 96 हजारपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केल्याचे दिसून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • मावळ लोकसभेची यंदाची निवडणूक सुरुवातीला बारणेंच्या बाजूने एकतर्फी होईल, असे चित्र होते. परंतू प्रचारात महाविकासआघाडीने लावलेल्या ताकदीमुळे निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली. आज निकाल जरी बारणेंच्या बाजूने लागलेला असला तरीही संजोग वाघेरे यांनी दिलेली झुंज सर्वांच्यात लक्षात राहणार आहे.

निवडणूकीआधी राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात आलेले संजोग वाघेरे यांनी त्यामानाने खुप लवकर निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. हळूहळू त्यांनी जनमत आपल्या बाजूने गोळाही केले होते. परंतू मित्रपक्षांची योग्य साथ मिळाल्याने श्रीरंग बारणेंचा विजय सोपा झाला. तरीही 2019 च्या मानाने बारणेंचे मताधिक्य घटले. यातच मविआचे कार्यकर्ते आता आनंद मानत आहेत. या पराजयानंतर संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी संदेश लिहिला असून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ( Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne won Shiv Sena UBT Sanjog Waghere Reaction After Defeat )

काय म्हणालेत वाघेरे? –
“या निवडणूकीत मतदारांनी जो कौल दिला तो मला मनस्वी मान्य आहे. निवडणूकीत जय – पराजय होत असतात. एखाद्या पराजयाने खचून न जाता आपल्या मावळ मतदारसंघाच्या सर्नांगीन प्रगतीसाठी यापुढेही मी तितक्याच उमेदीने कटिबद्ध राहील, असा शब्द देतो. आपल्या सेवेत मी कधीही भेदभाव, अडचणी, कमतरता येऊ देणार नाही. ज्यांनी विश्वास दाखवून मला मतदान केले त्यांना मनापासून धन्यवाद. लोकसभा निवडणूकीतील प्रवासात पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे सर्व हितचिंतक यांनी मला भक्कम साथ दिली, त्यांचे पण मनापासून आभार. माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचेच आभार!”

अधिक वाचा –
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा


dainik maval jahirat

Previous Post

‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया

Next Post

मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirang Barne chance for ministerial post

मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.