लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मावळ लोकसभेत यंदा कडवी लढत पाहायला मिळाली. मात्र, अंतिम निकाल समोर आला तेव्हा महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा तब्बल 96 हजारपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केल्याचे दिसून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- मावळ लोकसभेची यंदाची निवडणूक सुरुवातीला बारणेंच्या बाजूने एकतर्फी होईल, असे चित्र होते. परंतू प्रचारात महाविकासआघाडीने लावलेल्या ताकदीमुळे निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली. आज निकाल जरी बारणेंच्या बाजूने लागलेला असला तरीही संजोग वाघेरे यांनी दिलेली झुंज सर्वांच्यात लक्षात राहणार आहे.
निवडणूकीआधी राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात आलेले संजोग वाघेरे यांनी त्यामानाने खुप लवकर निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. हळूहळू त्यांनी जनमत आपल्या बाजूने गोळाही केले होते. परंतू मित्रपक्षांची योग्य साथ मिळाल्याने श्रीरंग बारणेंचा विजय सोपा झाला. तरीही 2019 च्या मानाने बारणेंचे मताधिक्य घटले. यातच मविआचे कार्यकर्ते आता आनंद मानत आहेत. या पराजयानंतर संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी संदेश लिहिला असून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ( Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne won Shiv Sena UBT Sanjog Waghere Reaction After Defeat )
काय म्हणालेत वाघेरे? –
“या निवडणूकीत मतदारांनी जो कौल दिला तो मला मनस्वी मान्य आहे. निवडणूकीत जय – पराजय होत असतात. एखाद्या पराजयाने खचून न जाता आपल्या मावळ मतदारसंघाच्या सर्नांगीन प्रगतीसाठी यापुढेही मी तितक्याच उमेदीने कटिबद्ध राहील, असा शब्द देतो. आपल्या सेवेत मी कधीही भेदभाव, अडचणी, कमतरता येऊ देणार नाही. ज्यांनी विश्वास दाखवून मला मतदान केले त्यांना मनापासून धन्यवाद. लोकसभा निवडणूकीतील प्रवासात पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे सर्व हितचिंतक यांनी मला भक्कम साथ दिली, त्यांचे पण मनापासून आभार. माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचेच आभार!”
अधिक वाचा –
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा