लोणावळा येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) शरद पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा होता. शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना धमकवल्याप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांच्यावर शरद पवारांनी त्यांच्या भाषणात सडकून टीका केली. तसेच, पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला… अशा कडक शब्दात दम देखील शरद पवारांनी आमदार सुनिल शेळके यांना दिला. त्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी तातडीने वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. पुढील आठ दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती समोर आणा अन्यथा पुरावे दिले नाहीतर, शरद पवारांनी खोटे आरोप केले असं राज्यभर सांगणार, असा इशारा आमदार सुनिल शेळकेंनी शरद पवारांना दिला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पवारांना खोटी माहिती देण्यात आली – शेळके
‘आज मावळ येथे पवार साहेबांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती. याच्या आयोजकांनी मागच्या आठ दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून पवार साहेबांसोबत यायला तयार आहेत, आपल्या हस्ते अनेकांन पक्ष प्रवेश करायचा आहे असं खोटं सांगून पवार साहेबांना मावळ येथे निमंत्रित केलं. कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 35 ते 40 कार्यकर्तेच उपस्थित होते. सभागृहात मित्र पक्षांचे 150 ते 200 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. परिस्थिती पाहिल्यावर आयोजकांनी शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली. सुनिल शेळकेनी कार्यकर्त्यांना दम दिला असं खोटं देखील सांगितलं. साहेबांनी (शरद पवार) देखील त्याबद्दल लगेच प्रतिक्रिया दिली.’ ( Maval MLA Sunil Shelke Press conference Reply given to NCP Sharad Pawar )
साहेबांनी असं का केलं याचं आश्चर्य वाटतंय – शेळके
‘शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणे अपेक्षित होतं. मागील 50 ते 55 वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तीगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय.’
…अन्यथा मी राज्यभर सांगणार की साहेबांनी खोटे आरोप केले – शेळके
‘मी साहेबांना भेटणार असून त्यांनी मी कोणच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली ते सांगावं. मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी (शरद पवार) माझ्यावर खोटे आरोप केले. ज्यांनी व्यक्तीने साहेबांना ही माहिती दिली त्याचे साहेबांनी पुरावे द्यावे, किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली हे मान्य करावं.’
मी चूक असेल तर जनता निर्णय घेईल – शेळके
‘पवार साहेब माझ्या प्रचारासाठी माझ्या मतदारसंघात आले. दादांनी मला उमेदवारी दिली हे मी आजही विसरलेलो नाही. पण जो व्यक्ती माझ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवतो. जो व्यक्ती हजारो कोटी रुपयांचा निधी विकासकमांसाठी देतो त्या अजितदादांची साथ मी का सोडावी? त्या अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणं उभं राहावं हे माझं व्यक्तीगत मत होतं. यात कोणाला चूक वाटत असेल तर जनता पुढे निर्णय घेईल.’ ( Maval MLA Sunil Shelke Press conference Reply given to NCP Sharad Pawar )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka
– पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात
– वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP