‘देशहितासाठी आणि देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांची ही निवडणूक नव्हती, तर अपप्रचार करणाऱ्यांची ही निवडणूक होती. समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि फूटीरतेची भावना पेरण्याचे काम विरोधी पक्षाने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात केले. तसेच एनडीए 400 पार गेल्यास संविधान बदलले जाणार हा अपप्रचार मतदारांमध्ये पसरवण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे एनडीए आघाडीला अपेक्षित यश नाही,’ असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लोणावळा शहरात आल्यावर खासदार श्रीरंग बारणे यांचा महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, भाजपाचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भोईर, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्यासह महायुतीचे अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( MP Shrirang Appa Barane was felicitated in Lonavala )
‘मावळ मतदारसंघात आजवर स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी आणण्याचं काम मी केलं आहे. पण आम्ही त्याचं भांडवल कधी केले नाही. सातत्याने खोटं नाट सांगितले तर ते सामान्य माणसाला खरं वाटत आणि तेच विरोधी पक्षाने आणि विरोधी उमेदवाराने माझ्याबाबतीत केले. माझ्या विरोधी उमेदवाराने त्यांच्या स्वतःच्या प्रभागात आजवर किमान एक तरी काम केलं का? मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. ही माझी कार्यपद्धती आहे,’ असे बारणेंनी मनोगतादरम्यान सांगितले.
‘लोकसभेची निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते. मतदारसंघ खूप मोठा असल्याने निवडणूक काळात मला सर्व ठिकाणी पोहोचता आलं नाही. पण महायुतीच्या कार्यकर्त्यांनी योग्य काम केले. त्यामुळेच माझा विजय सुकर झाल्याचे बारणे यांनी सांगितले. ज्यांनी मतं दिली त्यांचाही आणि ज्यांनी मतं नाही दिली त्यांच्यासह मी सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. मी सर्वांची काम करण्याकरिता निवडून आलो असून कोणामध्येही कसलाही दुजाभाव करणार नाही,’ असा विश्वास बारणेंनी दिला.
‘मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी देखील प्रामाणिक काम केलं. माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहीत आहे. मतदारांच्या डोक्यात विष पेरण्याचे काम विरोधी पक्षांनी केली. पण मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, 48 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मला मतदान केले,’ असेही बारणे म्हणाले.
अधिक वाचा –
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक
– हुश्श… ! मान्सून सरी बरसल्याने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत, शुक्रवारी 55 मी.मी. पाऊस । Pavana Dam Updates
– मोठी बातमी ! देशात पेपर लीक विरोधी कायदा लागू ; 10 वर्षे कारावास, 1 कोटी दंडाची तरतूद, वाचा सविस्तर