व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha

मावळात अनेक ठिकाणी वनविभागाच्या अडथळ्यामुळे कामे थांबली आहेत, हा केंद्राशी निगडित विषय असताना तो प्रश्न कधी मांडला नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sanjog-Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


“मावळातील रखडलेला विकास करण्यासाठी यावेळी कोणाच्या हवेवर निवडून येणारा नव्हे तर सुस्वभावी आणि सुसंस्कृत सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र काम करणारा उमेदवार संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे. अशा तरूण उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करत सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला व आपल्या नात्या गोत्यातील असलेला उमेदवार म्हणजेच संजोग वाघेरे असून त्यांना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे”, असे वक्तव्य मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाविकास आघाडी (इंडिया) चे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आंबी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार महर्षी माऊली दाभाडे यांसह पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, प्रचार प्रमुख व उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, संभाजी राक्षे, माजी सरपंच संदीप काशिद, शैलेश मुऱ्हे, गोविंद अंभोरे, मोहन घोलप व पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच आंबी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. ( maval ncp leader mauli dabhade on sanjog waghere candidacy )

माऊली दाभाडे यांनी मावळ विधानसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून मेळावे आयोजित केले आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय मतदारांच्या भेटी घेत त्यांनी इंडिया आघाडीला निवडून देणे का गरजेचे आहे हे सांगत आहे. मावळ तालुक्याचा विकास साधायचा असेल तर यावेळी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही असे दाभाडे यांनी सांगितले. मागील दोन निवडणुकीत मावळ तालुक्याने ज्यांना निवडून दिले त्यांनी काय विकास केला हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षात एक सांगता येईल असे काम केले नाही. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही, महिलांसाठी काही ठोस करता आले नाही. निसर्ग संपन्न मावळ तालुका असताना येथील पर्यटन विकासासाठी काय केले? असा सवाल दाभाडे यांनी उपस्थित केला.

मावळात अनेक ठिकाणी वनविभागाच्या अडथळ्यामुळे कामे थांबली आहेत, हा केंद्राशी निगडित विषय असताना तो प्रश्न कधी मांडला नाही. कोणताच प्रश्न सुटलेला नाही, मतदार संघात कधी फिरायचे नाही, मतदारांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, अशा व्यक्तीला पुन्हा का? व कशासाठी निवडून द्यायचे, असा प्रश्न मेळाव्यात अनेकांनी उपस्थित केला. ‘मावळातील रखडलेला हा विकास करण्यासाठी यावेळी कोणाच्या हवेवर निवडून येणार नाही तर सुस्वभावी आणि सुसंस्कृत अशा तरूण उमेदवाराला निवडून आणायचेच, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला, सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र काम करणारा व आपल्या नात्यागोत्यातील असलेला उमेदवार म्हणजेच संजोग वाघेरे यांना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. त्यांच्याकडून मावळातील पर्यटनाचे, युवकांचे, शेतकरी व महिलांचे प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्वजण घेतो,’ असे यावेळी सांगण्यात आले.

अधिक वाचा –
– “ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून”, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर
– ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा
– ‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार


Previous Post

दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा

Next Post

‘ईव्हीएम मशीनमध्ये चीप बसवून उमेदवाराला जास्त मतदान करून देतो’ अशा बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
EVM

'ईव्हीएम मशीनमध्ये चीप बसवून उमेदवाराला जास्त मतदान करून देतो' अशा बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.