व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून”, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भव्य जाहीर सभा' आयोजित करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2024
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
DCM Devendra Fadnavis rally

Photo Courtesy : FB / Prashant Thakur


मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘भव्य जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली होती. खारघर येथील श्री रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडली. सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचा निर्धार बोलून दाखवला. तसेच यावेळी फडणवीस यांनी श्रीरंग बारणे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांना मिळणाऱ्या मतांबद्दलही विधान केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय म्हणाले फडणवीस ?
‘श्रीरंग बारणे यांना सर्वात जास्त लीड पनवेल विधानसभामधून मिळणार आहे. ही देशाची निवडणूक आहे, महानगरपालिकेची नाही. त्यामुळे विकासपुरूष असलेल्या मोदींना निवडून द्या. महायुतीला विजयी करा. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 28 पक्षांची खिचडी तयार झाली आहे. महायुतीची गाडी ही विकासाचे मेट्रो आहे. याचे इंजिन मोदी आहेत. सर्व जातीच्या लोकांना गाडीत बसवून विकासाकडे जात आहेत. दुसरीकडे रेल्वे गाडीला फक्त इंजिन आहेत, डबे नाहीत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण गाडीचे इंजिन बनत आहे. त्यामुळे जो तो आपल्याला हवे त्या दिशेने इंजिन घेवून जाणार आहे.’ ( DCM Devendra Fadnavis’s rally to campaign for Maval Lok Sabha candidate Shrirang Barane )

विरोधकांवर जोरात टीका –
‘इंजिनमध्ये फक्त दोघांना बसायला जागा आहे. ठाकरे, पवार, गांधींनी स्वत:च्या परिवाराची सोय केली. मोदींनी 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. घरे दिली, गॅस दिला, मुद्रा लोन दिले. 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचे कर्ज मुद्रा लोनने दिले. यातील 31 कोटी महिला आहेत. बचत गटाचा मोठा सहभाग आहे. 10 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे काम मोदी करणार आहेत. महिलांना मुख्य धारेत आणले आहे. यापुढे 33 टक्के आमदार आणि खासदार महिला असतील. अनुसुचित जाती, अदिवासी समाज, 12 बलुतेदारांचा विचार केला. यासाठी 14 हजार कोटींची योजना आणली.’

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune News
– Maval Lok Sabha : मावळमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूतीची सुप्त लाट ? संजोग वाघेरेंना होणार फायदा… । विशेष लेख
– मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा

Next Post

आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-MIDC-Police-Station

आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.