Dainik Maval News : मावळ तालुक्याची सुवर्णकन्या सेजल मोईकर हिचा सन्मान करण्यात आला आहे. सेजल हिने दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत 76 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत मावळ तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुदवडी सारख्या छोट्याशा गावातील आणि शेतकरी कुटुंबातील सेजल मोईकर हिने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. सेजल मोईकर ही इंद्रायणी जीमची खेळाडू आणि इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला स्पर्धेसाठी इंद्रायणी प्रशिक्षक नितीन म्हाळसकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचे मार्गदर्शन लाभले.
सेजल मोईकरला आशियाई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान देखील मिळाला आहे. याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सेजलला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश देत सन्मानित केले. तसेच उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक वाचा –
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे
– बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News