Dainik Maval News : आज गावोगावी फिरणारे नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात कुठे होते, त्यांनी जनतेसाठी काय केले, हा प्रश्न निश्चितच मावळ तालुक्यातील जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
2019 पूर्वी दहा वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी या मावळ तालुक्याच्या विकासासाठी काय केले, ते त्यांनी या प्रचारादरम्यान सांगावे. मात्र सांगण्यासारखे काही नसल्याने केवळ सुनील शेळके यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे टीका-टिप्पणी करणे हाच एक कलमी कार्यक्रम विरोधकांकडून राबविला जात आहे, असा आरोप शेळके यांनी केला.
सत्तेच्या माध्यमातून विकासकामे
2016 सालापासून मी या मावळ तालुक्यामध्ये फिरत असताना तालुक्यातील रस्ते, पाणी या समस्या मला दिसत होत्या. त्या सोडवण्यासाठी मी त्याकाळी वैयक्तिक स्वरूपात प्रयत्न केले. मात्र ते प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे असतील तर सत्ता असणे गरजेचे आहे. याकरिता 2019 ची निवडणूक लढवली व निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये निधी देत त्या त्या भागातील समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, अशी माहिती शेळके यांनी दिली.
विकास कामांचे लोकर्पणही नागरिकांच्याच हस्ते
मावळ तालुक्यामधील रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याच्या समस्या असतील, या सोडवण्याचे काम केले. तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालये उभी केली. सर्व शासकीय कार्यालये उभी रहात आहेत. जनतेला येत्या काळात वडगाव येथे आल्यावर एकाच ठिकाणी सर्व शासकीय सुविधा मिळणार आहेत. तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही जनतेसाठी हे का केले नाही. मी हे करत असताना कोठेही श्रेय न घेता त्या त्या भागातील जेष्ठ व्यक्ती असतील महिला असतील यांच्या हस्ते त्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटने केली. हे सर्व माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला माहीत आहे, असे आमदार शेळके म्हणाले.
विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका
काही स्वार्थी नेते मंडळी तालुक्यात विविध भागात जाऊन सर्वसामान्य नागरिकांची माथी भडकवण्याची कामे करत आहेत. मात्र मी माझ्या मतदार बंधू भगिनी व माता-भगिनींना सांगू इच्छितो की, येणाऱ्या काळामध्ये मावळ तालुक्याच्या विकासाला आपण मत द्या, मावळ तालुक्याचा विकास थांबवण्याचे काम या विरोधकांकडून सुरू आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न
– ‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News