लोणावळा ते पुणे दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लोणावळ्यात थांबा देण्यात यावा, यासह अनेक प्रलंबित मागण्यासांठी लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (सोमवार, दि. 11 डिसेंबर) रेल रोको आंदोलन करण्यात आले. मनसैनिकांनी थेट लोणावळा रेल्वे स्थानकात घुसून रेल रोको आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून काही मिनिटे डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मनसे कार्यकर्त्यांना बाजूला करताना लोणावळा पोलिसांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरु कराव्यात. एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळा शहरात असावा ह्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील अन्य शहरे आणि गावांतून पुणे शहरात दररोज हजारो नागरिक जात असतात. तसेच लोणावळा शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. लोणावळा हे पर्यटन क्षेत्रही आहे. त्यामुळे अनेकदा पर्यटकांकडून रेल्वेचा मार्ग पत्करला जातो. ( Maval Taluka Big News MNS Party Workers Rail Roko Agitation At Lonavala Station )
परंतू, अनेक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या लोणावळ्यात थांबत नाही. तसेच कोविडपासून दुपारची लोकल सेवा बंद आहे. लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थी, कामगार, महिला-विद्यार्थीनी, सामान्य नागरिक, वृद्धांना तासन् तास रेल्वेची वाट पाहावी लागते. लांब पल्ल्याच्या कित्येक एक्सप्रेस गाड्याही लोणावळ्यात थांबा घेत नाहीत. सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. या सर्व गोष्टींनी नागरिक त्रस्त असून मागील वर्षभरापासून याबद्दल विविध संघटना आवाज उठवत आहे. परंतू, त्याचा काहीही परिणाम होत नसल्याने अखेर हे पाऊल उचलावे लागल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही
– मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
– पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा