वडगाव मावळ येथे महाराष्ट्र लोकसभा प्रवास योजना प्रदेश संयोजक बाळा भेगडे आणि मावळ लोकसभा संयोजक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मावळ लोकसभा / विधानसभा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी बाळासाहेब पाटील यांचे भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ( Maval Taluka BJP Vidhan Sabha And Lok Sabha Core Committee Meeting Concluded At Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आगामी काळात मावळ लोकसभा प्रभारी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे मावळ विधानसभा क्षेत्रात प्रवास करून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यादृष्टीने त्याची पूर्व तयारी म्हणून हि विशेष बैठक घेण्यात आली. होती तसेच दौऱ्यासंदर्भात कोअर कमिटी सदस्यांना करावयाच्या संघटनात्मक कार्यासंदर्भात बाळासाहेब पाटील आणि बाळा भाऊ यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले गेले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्कर म्हाळसकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत शेटे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे यांच्यासह मावळ लोकसभा कोअर कमिटी आणि मावळ विधानसभा कोअर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु