Dainik Maval News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, याकरिता मावळ तालुका काँग्रेस कमिटीकडून वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या व जिविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेवून मावळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने धमक्या देणाऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात यावी,’ अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
पंचायत समिती कार्यालय मावळ समोर झालेल्या निषेध मोर्चात तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेश वाघोले, महिला कार्याध्यक्षा रूपाली शिरसागर यांसह विशाल वाळुंज, गफूर भाई शेख, खंडू तिकोने, प्रतिमा हिरे, बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष विशाल पहिले, कौस्तुभ ढमाले, नाना खांदवे, अनिष तांबोळी, दामोदर मराठे, प्रताप हुंडेकरी, किरण मोकाशी, गोरख काकडे, गोरख काकडे, जयश्री मदगे, रोहित नलावडे, निखिल मुऱ्हे उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, दत्तात्रय पडवळ, खंडू तिकोने, विशाल वहिले, राजेश वाघोले या मान्यवरांनी निषेध विषय मनोगत व्यक्त केले. संजय गायकवाड, अनिल बोंडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यासाठी वडगावचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.
अधिक वाचा –
– Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?
– रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News
– प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी