राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकांमध्ये मावळ तालुक्यातील 29 गावांचा समावेश होता. यात 19 गावांच्या सार्वत्रिक तर पोटनिवडणूका असलेल्या 10 गावांचा समावेश होता. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ होती. त्यामुळे 25 तारखेला सायंकाळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे एकुण चित्र स्पष्ट झाले. यात, मावळ तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर, 15 गावांमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात असून सदस्य पदांच्या 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध झाल्यामुळे सदस्य पदाच्या 79 जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहे.
तर, पोटनिवडणूका असलेल्या 10 गावांमध्ये शिरगांव आणि पुसाणेच्या सरंपच पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर सदस्य पदाच्या पोटनिवडणूकीत नवलाख उंबरेची एक जागा, पुसाणेच्या 7 जागा, सावळा गावची एक जागा, शिवणेच्या 2 जागा अशा सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर पोटनिवडणूकीत कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसेच्या प्रत्येकी एक आणि दारुंब्रेच्या 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या गावांतील स्थिती :
मावळ तालुक्यात एकूण सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 गावांपैकी 4 गावे ही सरपंच पदासह पुर्णतः बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित 15 गावांत निवडणूक लागली आहे. या 15 गावांत देखील अनेक गावांतील सदस्य पदाच्या काही जागा या बिनविरोध झाल्या आहेत. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 News and Statistics )
सरपंच पदासह बिनविरोध निवडणूक झालेली गावे –
आढले बुद्रुक, लोहगड, बेबडओहोळ, ओवळे
निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती
1. साळुंब्रे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 5 उमेदवार
2. शिळींब –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
3. डोणे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
4. कोंडिवडे आं.मा. –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 6 जागा बिनविरोध
– 1 जागेसाठी 2 उमेदवार
5. सुदुंबरे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 11
– 10 जागा बिनविरोध
– 1 जागा रिक्त
6. कल्हाट –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
7. उधेवाडी –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 4 उमेदवार
8. मळवंडी ढोरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7 सदस्य
– 15 उमेदवार
9. भाजे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 19 उमेदवार
10. सांगिसे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 2 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
11. सुदवडी –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
12. जांबवडे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 1 जागा बिनविरोध
– 6 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणार
13. मुंढावरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 3 जागा बिनविरोध
– 9 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
14. दिवड –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 4 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 10 उमेदवार
15. आंबळे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 1 जागा बिनविरोध
– 8 जागांसाठी 17 उमेदवार
एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 अर्ज आले आहेत. यात शिळींब, कोंडिवडे (आं.मा.), उधेवाडी, मळवंडी ढोरे, सांगिसे, मुंढावरे, दिवड या गावांत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच या एकूण 15 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 79 सदस्य पदांच्या जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 News and Statistics )
पोटनिवडणूका निवडणूका जाहीर झालेल्या गावांतील स्थिती :
मावळ तालुक्यात 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यात शिरगाव आणि पुसाणे गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक, तर पुसाणेसह कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसे, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, सावळा, शिवणे गावच्या सदस्य पदाची पोटनिवडणूक होती.
पोटनिवडणूक बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती.,
शिरगाव – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सदस्य – 7 जागा – बिनविरोध
नवलाख उंब्रे – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
सावळा – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
शिवणे – सदस्य – 2 जागा – बिनविरोध
एकूण सरपंच पदाच्या दोन आणि सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध निवडूण आल्या आहेत.
पोटनिवडणूक असलेल्या आणि निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती.,
कान्हे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
खांडशी – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
कुसगाव – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
चिखलसे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
दारुंब्रे – सदस्य संख्या 3 – उमेदवार 9
एकूण 7 सदस्य पदाच्या जागांसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत.
एकंदरीत मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 उमेदवार, सदस्य पदांच्या 86 जागांसाठी 182 उमेदवार असे एकूण 219 उमेदवारांचे भवितव्य दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
अधिक वाचा –
– गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव ह्या पुलांची कामे 30 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश
– तळेगावमधील ‘म्हाडा’ सदनिकाधारकांच्या विविध समस्यांबाबत पुण्यात संयुक्त बैठक; ‘या’ तारखेपर्यंत सर्वांना घराचे ताबे मिळणार
– महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?