व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका

रविंद्र भेगडे यांची पक्षाच्या मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आणि दत्तात्रय गुंड यांची पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-taluka-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड आणि माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्याचे दिसत आहे. सरपंच पदाच्या सार्वत्रिक आणि सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणूकां मिळून झालेल्या एकूण 21 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत. यासह या दहाही ग्रामपंचायतींवर भाजपाचीच सत्ता आल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी हि माहिती दिली. ( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates BJP Sarpanch In 10 Villages )

रविंद्र भेगडे यांची पक्षाच्या मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आणि दत्तात्रय गुंड यांची पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. तसेच महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींवर जनतेने भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांना गावचा कारभार करण्याची संधी दिल्याचे निवडणूक निकालातून दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

साळुंब्रे ग्रामपंचायत सरपंच पदी विशाल शामराव राक्षे, आढले बू – सुवर्णा बाळासाहेब घोटकुले, ओव्हळे – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे, डोणे – ऋषीकेश कोंडीबा कारके, लोहगड – सोनाली प्रमोद बैकर, आंबळे – आशा संपत कदम, उदेवाडी – नेहा अक्षय उंबरे, शिळींब – सिद्धार्थ चंद्रकांत कडू, जांबवडे – तानाजी बंडू नाटक तर पुसाणे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अमोल ज्ञानेश्वर वाजे यांची निवड झाली आहे. हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून जनतेने भाजपाच्या उमेदवाराला गावचा कारभार करण्यासाठी निवडून दिल्याचे रविंद्र भेगडे यांनी माध्यमांना सांगितले.

“आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मावळ लोकसभा आणि मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होणार असून आजचा निकाल हा त्याचीच नांदी आहे” – रविंद्र भेगडे (भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख – मावळ)

अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी


Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Next Post

गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
gram-panchayat-sarpanch-election

गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.