मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बाद झालेल्या उमेदवारी अर्जांबाबत दाखल झालेल्या अपिलांवर मंगळवारी (दि. 6 फेब्रुवारी) सुनावणी होणार असल्याची माहिती सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिली. मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून नुकत्याच झालेल्या छाननीत दोन अर्ज बाद झाले होते. त्याबाबत कांदळकर यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कांदळकर यांची भेट घेऊन अवैध अर्जांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले आदी उपस्थित होते. अपिलांबाबत मंगळवारी सुनावणी होणार असून नियमानुसार त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कांदळकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Nivdnuk Mahayuti Leaders Met Election Officer )
सोमवारी (दि. 5) दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी आणि सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांची भेट घेऊन निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासंदर्भात चर्चा करून सूचना करण्यात आल्या.
अधिक वाचा –
– मावळच्या शिवली गावातील आदेश आडकरची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला भगवा ध्वज!
– ‘राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार’, शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर
– संजोग वाघेरे यांचा बुधवारी पवन मावळ दौरा, गडपूजनाने होणार सुरुवात, पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद । Sanjog Waghere Maval Lok Sabha