व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदग्रहण समारंभ पार पडला.

  • कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धरतीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम यांचा देखील समावेश केला जाणार आहे.

नवीन संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार संघाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपसंपादक योगेश माडगूळकर यांनी मावळातील सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, निखिल कवीश्वर यांनी पत्रकार संघाच्या गरजांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे स्वागत विशाल विकारी यांनी केले. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी तर सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले. अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही संघटना मावळ तालुक्यातील पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
सल्लागार : सोनबा गोपाळे, बबनराव भसे, विलास भेगडे, ज्ञानेश्वर वाघमारे, निखिल कवीश्वर
मुख्य पदाधिकारी : अध्यक्ष : सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष : विशाल विकारी, उपाध्यक्ष : अमीन आफताब खान व भारत काळे, सचिव : रामदास वाडेकर, खजिनदार : संकेत जगताप, प्रकल्पप्रमुख : गणेश विनोदे, कायदेशीर सल्लागार : ॲड. किशोर ढोरे, सदस्य : सचिन शिंदे, चैत्राली राजापुरकर, सचिन ठाकर, मुकुंद परंडवाल.
पदसिद्ध सदस्य : विशाल पाडाळे (अध्यक्ष लोणावळा), अतुल पवार (अध्यक्ष तळेगाव), रेश्मा फडतरे (अध्यक्ष तळेगाव प्रेस), चेतन वाघमारे (अध्यक्ष कामशेत)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक
– महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News
– वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval


Previous Post

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.