Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहविचार बैठक वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार सुनिल शेळके विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजुर करण्यात आला. शनिवारी (दि.8) महायुतीचा मेळावा होणार असून त्यात आमदार सुनील शेळके यांचा जंगी सत्कार करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार सुनिल शेळके यांच्या अभिनंदन ठरावाला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत टाळ्यांच्या कडकडाटासह मंजुरी मिळाली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ही सहविचार बैठक संपन्न झाली.
- विधानसभा निवडणुकीनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेली ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला सुकाणू समितीचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, गाव अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या वतीने शनिवा, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मेळावा घेऊन आमदार सुनिल शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
यावेळी विधानसभा निवडणुकीत अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्ते, बंधू भगिनींचे गणेश खांडगे यांनी कौतुक केले. संघटनात्मक कामाचा आढावा घेताना खांडगे म्हणाले की,पक्ष संघटनेची वाटचाल करीत असताना सभासद नोंदणी झाली. गाव विभाग, वार्ड व शहर निहाय संघटना उभी राहिली, सर्व सेल ऍक्टिव्ह राहिले. संघटनेचे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे राबवले.
बैठकीत वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली गराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link