Dainik Maval News : मावळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने वडगाव मावळ येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंजकर, शिवसेनेचे शरदराव हुलावळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, राजू खांडभोर, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य रघुवीर शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते. शिवसेनेच्यावतीने नेहमीच गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार, राम सावंत, धनंजय नवघणे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, नितीन देशमुख, सोमनाथ कोंडे, लोणावळा महिला शहर संघटिका मनीषा भांगरे यांची उपस्थिती लाभली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News

