Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा आणि परिसरातील चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नववर्षात या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेत सुधारणा होईल.
सध्या या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते व औद्योगिक वाढ झपाट्याने होत आहे. मात्र, कमी मनुष्यबळामुळे ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून तातडीने प्रतिसाद देण्यात अडचणी येतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी ही ठाणी जोडल्यास कायदा आणि सुव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अधिक सुसज्ज सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे येथे जोडले गेल्यास गुन्हेगारीला आळा घालता येईल. जलद प्रतिसाद मिळेल आणि नागरिकांना अधिक चांगली सुरक्षा मिळेल. महामार्गावरील अपघात आणि इतर घटनांवर देखील जलद कारवाई होईल, असे बोलले जात आहे.
तसेच, लोणावळा आणि कामशेत येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. जर ही ठाणे आयुक्तालयाशी जोडली तर अधिक पोलीस गस्त होईल, सुरक्षितता वाढेल, आणि पर्यटकांचे पर्यटन निर्धोक होईल. यासह औद्योगिक आणि आर्थिक वाढीमुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. या प्रस्तावामुळे गुन्हेगारी कमी होईल, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.
मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत आणि लोणावळा हा परिसर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहर पोलीस दलात अधिक मनुष्यबळ, अधिकारी-कर्मचारी आणि आवश्यक साधने उपलब्ध असल्याने, हा परिसर जोडल्यास येथील नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस मदत मिळेल – विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News