Dainik Maval News : विधानसभा निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून ते दुसऱ्या टर्मसाठी तयारीत आहेत. दुसरीकडे आमदार सुनिल शेळके यांना त्यांच्याच पक्षातून दुसऱ्यांदा आमदारकीसाठी विरोध होताना दिसत आहे. आमदार शेळके यांना विरोध करणारे स्वपक्षातील त्यांचे सहकारी त्यांच्या पक्षांतराबद्दल आणि एकदा संधी द्या असे सुनिल शेळके म्हटले होते, यावर चर्चा करताना दिसतात. त्याबद्दल अखेर सुनिल शेळके यांनीच आपले मौन सोडले असून स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…
‘आमदार सुनिल शेळके भाजपातून राष्ट्रवादीत आले आणि एकदा आमदार होण्याची संधी मागितली म्हणून त्यांना उमेदवारी दिली, पण ते आता दुसऱ्यांदा आमदारकीसाठी तिकीट मागतायेत’ असा आरोप होत असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी आमदार सुनिल शेळके यांना प्रकट मुलाखतीदरम्यान विचारला. त्यावर बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी हे सर्व आरोप फेटाळले. तसेच, आपण एकदा संधी द्या असे पक्षाकडे कधीही बोललो नव्हतो आणि चारभिंतीआडही बोललो नव्हतो, असे ठामपणे सांगितले. ‘मी एकदा संधी द्या असं बोललो होतो, पण ते मावळच्या चाळीत ते पंचेचाळीस हजार जनतेपुढे बोललो होतो. मावळच्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकवेळ संधी द्या असं मावळच्या जनतेला बोललो होतो, कुठेही चारभिंतीआड किंवा पक्षाकडे तसं बोललो नव्हतो, असे आमदार सुनिल शेळके यांनी ठोकपणे सांगत सर्व चर्चांवर पुर्णविराम दिला.
तिकीटाचा निर्णय अजितदादा घेतील…
पक्षात उमेदवारीसाठी प्रत्येकजण लॉबिंग करत असतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील तीन चार जण इच्छुक आहेत. ते प्रदेशाध्यक्षांकडे जातात, जिल्हाध्यक्षांकडे जातात. उमेदवारी मागितली जाते. परंतु राष्ट्रवादीत उमेदवारीचा अंतिम निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार हेच घेतली, असेही आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.
कार्य अहवालाचे प्रकाशन लवकरच…
आमदार सुनिल शेळके यांनी या मुलाखतीत आपण तालुक्यात 2900 कोटींची कामे शासकीय निधीतून केल्याचे सांगितले. त्यासह विविध संस्था, एनजीओ, कंपन्या, दानशूर व्यक्ती यांनीही मदत केली. या पैशातून केलेल्या पै अन् पै चा हिशोब आणि विकासकामांची गावनिहाय माहिती असलेल्या कार्यअहवालाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. 4 ऑक्टोबरला तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आहे, त्यावेळी ह्या कार्यअहवालाचे प्रकाशन करणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. ( Maval Vidhan Sabha Election MLA Sunil Shelke comments on the opposition in NCP party )
अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन