Dainik Maval News : रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या ‘होम ग्राउंडवर’ अर्थात तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन परिसरात ‘रोड शो’ करीत तर संध्याकाळी गावभागात भव्य पदयात्रा काढीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपल्या मनोगतात देखील तुफान फटकेबाजी करीत शेळकेंनी प्रचाराचा ‘सुपर संडे’ साजरा केला.
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दमदाटी, मारहाण करणाऱ्या, तुमचा वारंवार अपमान करणाऱ्या विरोेधकांना त्यांची जागा दाखवून द्या, असे भावनिक आवाहन मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि.17) केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या तळेगाव स्टेशन भागातील ‘रोड शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुण आणि महिलांची सहभाग लक्षणीय होता. माळवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, मनोहर नगर, नवी भाजी मंडई, भंडारा दर्शन कॉलनी, नाना भालेराव कॉलनी, शिवाजी महाराज चौक स्टेशन, इंद्रायणी कार्यालय, रेल्वे ग्राउंड, यशवंतनगर, राजगुरव कॉलनी, म्हाळस्करवाडी, साई रेसिडेन्सी, स्वराज नगरी, मामासाहेब खांडगे नगर या भागात शेळके यांनी रोड केला. कोणालाही न घाबरता जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.
भव्य पदयात्रेतून शक्तीप्रदर्शन
संध्याकाळी तळेगावात काढलेल्या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. या पदयात्रेच्या निमित्ताने शेळके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या पदयात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शेळके समर्थकांचा उत्साह दुणावला आहे. कडोलकर कॉलनी येथील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या पदयात्रेला सुरूवात झाली. जिजामाता चौकातून संपूर्ण गावात फेरून मारुती मंदिर चौकात रात्री प्रचारफेरीची सांगता झाली.
आमदार शेळके यांच्या समवेत आज श्रीमंत सरदार सत्येंद्र राजे दाभाडे, सत्यशील राजे दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगरसेवक संदीप शेळके, चंद्रकांत दाभाडे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबाभाई मुलाणी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शैलजा काळोखे आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime