व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : बाळासाहेब नेवाळे यांचा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडेंना जाहीर पाठींबा

कामशेत येथील छत्रपती शिवाजी चौकात बाळासाहेब नेवाळे यांनी 'लढा दडपशाही विरुद्ध' या सभेचे आयोजन केले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Vidhan Sabha Public support of Balasaheb Newale to candidate Bapusaheb Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा दूध संघाचे (कात्रज) माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही नेवाळे यांनी मतदारांना केले आहे.

कामशेत येथील छत्रपती शिवाजी चौकात बाळासाहेब नेवाळे यांनी ‘लढा दडपशाही विरुद्ध’ या सभेचे आयोजन केले होते. सभेला माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा नेते गणेश भेगडे, काँग्रेसचे नेते रामदास काकडे, माऊली शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळासाहेब नेवाळे म्हणाले की, गुन्ह्यांशी संबंध नसताना मुद्दाम गोवले जाते, तेव्हा खूप त्रास होतो. माझ्यावर गुन्हे मुद्दामहून दाखल केले. पोलिसांनी योग्य निर्णय घेतला नाही तर 5 डिसेंबरला धरणे आंदोलन करणार आहे. यासह बापू भेगडे यांना पाठिंबा देतानाच त्यांनी आमदार शेळकेंना इशारा दिला, की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सुडबुद्धीने वागू नका, अन्यथा एक दिवस रसातळाला जाल.

नेवाळेंवर अन्याय झाला : रामदास काकडे
गुजरात हे आघाडीवर चाललेले राज्य आहे. वर्गिस कुरियन यांच्यामुळे दूध क्रांती झाली. त्यामुळे शेतकरी सुखी व समाधानी झाला. तेच काम गोकुळ, कात्रज दूध संघाने केले आहे. बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज डेअरी व शेतकऱ्यांना बोनस देण्याची सुरुवात केली. त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले आहे. एवढं काम असूनही नेवाळे यांच्यावर अन्याय केला.

मावळात सहकार हरवलाय : माजी मंत्री मदन बाफना
मावळ तालुक्यात ज्या विविध कार्यकारी सोसायटीला स्वतःची इमारत आहे, अशी एकही सोसायटी मावळ तालुक्यात नाही. सहकार जगला तर राज्य जगेल, पण मावळात कुठे आहे सहकार ? गावकऱ्यांनी सोसायट्याकडे लक्ष दिले नाही, तर गावांचे वाटोळं होणार आहे.

मावळात विकास वेडा होऊन हरवलाय : गणेश भेगडे
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती आहेत. मात्र, मावळात सर्वपक्षीय विरुद्ध एक अशी लढत का आहे, याचा विचार समोरच्याने केला पाहिजे. तालुक्यात चाललेला कारभार पसंत नाही म्हणून आम्ही एक झालो आहोत. निवडणूक संपली की राजकारण संपले पाहिजे. सगळे माझे आहेत हे समजून कामाला लागले असते तर आज मावळची राजकीय स्थिती स्वच्छ असली असती.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon

Next Post

साजगावची प्रसिद्ध बोंबल्या विठोबाची यात्रा’ दोन दिवस बंद राहणार ! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Yatra to Bomblya Vithoba in Sajgaon will be closed for two days during election polling

साजगावची प्रसिद्ध बोंबल्या विठोबाची यात्रा' दोन दिवस बंद राहणार ! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.