Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार दौऱ्यात अनेक उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग पाहायला मिळत आहे. बापूसाहेब भेगडे यांनी मांडलेल्या व्हिजनची सध्या तरूणाईत चर्चा असून युवा वर्गाचा मोठा पाठिंबा बापूसाहेब भेगडेच यांना मिळताना दिसत आहे.
सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे, अहिरवडे, नायगाव, येवलेवाडी, चिखलसे, कुसगाव खुर्द, खामशेट, पाथरगाव, खडकाळे कामशेत, वडगाव शहर या सर्व गावांत बहुसंख्येने उपस्थित राहत महिलांनी औक्षण केले. फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. यावेळी माजी सभापती बाबुराव वायकर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदी मान्यवर, आजी-माजी सरपंच, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबुराव वायकर म्हणाले, अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली. मात्र, काहीजण या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जलजीवन मिशनची टाकी दुसऱ्याच दिवशी कशी काय पडू शकते? वारकरी संप्रदायचा वसा चालवणारे, शाश्वत विकास करू शकणारे, उच्च शिक्षित, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिजन असणारे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून काम करणारे बापूसाहेब भेगडे हेच मतदारांची पसंती आहेत.
बापूसाहेब भेगडे म्हणाले, की शिक्षण, महिला सुरक्षितता, तरुणांच्या हाताला काम आदी गोष्टींमुळे मावळ समृद्ध, सुसंस्कृत होण्यास मदत होणार आहे. घराचं घरपण आणि गावाचं गावपण टिकलं पाहिजे. पण आज एकाधिकारशाहीमुळे आज नेमक्या याच गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके