Dainik Maval News : ही निवडणूक लढायला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. बाकी मला काही नको. तुमच्या आशीर्वादाने मी यापुढेही अधिक जोमाने कामे करत राहीन, अशा भावना मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.
आमदार सुनील शेळके यांचा बुधवारी उर्से, आढे येथे जनसंवाद दौरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, खरेदी विक्री संघांचे संचालक प्रशांत भागवत, सुदवडीचे सरपंच सुमित काराळे, आढे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रोहिदास गराडे, ज्येष्ठ नेते विष्णू मुऱ्हे, संदीप शेळके, सरपंच सुनीता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेळके पुढे म्हणाले की, निवडणूक लढताना वैचारिक पद्धतीने लढायला हवी, विकास काय करणार, या मुद्यावर लढली पाहिजे. दमदाटी करून नाही. दम देऊन समोरच्या माणसाच्या फोनमधला, स्टेटसवरचा सुनील शेळके काढू शकता, पण लोकांच्या मनातला सुनील शेळके कसा काढणार, असा सवाल त्यांनी केला.
कोणत्याही प्रलोभनांना अथवा दहशतीला बळी पडून मतदान करू नका. तसा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला मतदानाच्या दिवशी ठेंगा दाखवून घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबा. तुम्हाला एकदाच ५,००० रुपये हवे आहेत की पुढील ५ वर्ष विकासाची हवीत, असा प्रश्न त्यांनी मतदारांना केला.
गणेश खांडगे म्हणाले, ‘मला सर्वांच्याच चेहऱ्यावर आतुरता व उत्साह दिसतोय. सुनील अण्णा यांना परत विधानसभेत पाठवण्याची जनतेनी केलेली तयारी तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय. ही भावना जर मनातून प्रेम असेल तरच येते’.
सुनीता सुतार म्हणाल्या, ‘गावाची कामे फक्त सुनील अण्णांनी केली आहेत. मी सरपंच असल्यापासून ७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. एवढी कामं झाली आहेत की त्याची यादी सांगण्यात खूप वेळ जाईल. म्हणून मी गावच्या महिलांच्या वतीने सांगते की ‘कहो दिलसे, सुनील अण्णा फिरसे’!”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police