Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक वडगाव येथे उपस्थित झाले होते. अर्ज भरून झाल्यानंतर सुनिल शेळके काय बोलणार याची आतुरता या नागरिकांना होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक हा सुनिल शेळके यांचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिला होता.
वडगाव येथे आलेल्या महिला, तरुणी, युवक युवती या सर्वांनी अक्षरशः आमदार सुनिल शेळके यांच्या उमेदवारी अर्जाचा जल्लोष व आनंद उत्सव साजरा केला. आमदार सुनिल शेळके यांनी केलेले शक्ती प्रदर्शनाला मात करण्यासाठी विरोधकांनी तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकांना आणल्याचा चर्चा होत आहेत.
मात्र, रॅली पुरते आलेले हे नागरिक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे भाषण ऐकण्यासाठी देखील थांबले नाहीत, याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी सुनिल शेळके यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याची बोम उटवत त्यावर हरकत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाने त्याला देखील चपराक देत आमदार सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरवला आहे.
तसेच सुनिल शेळके हे ईव्हीएम मशीन वर क्रमांक एकचे चिन्ह देण्यात आले आहे. विरोधकांच्या सगळ्या खेळी अपयशी ठरवू लागल्याने व आमदार सुनिल शेळके हेच प्रत्येक ठिकाणी वरचढ होत असल्याचे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. निवडणुकीला अजून वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
प्रचारासाठी 18 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र या ना त्या कारणाने आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात कुरघोडी करायची हे विरोधकांकडून सुरू आहे. आमदार सुनिल शेळके यांनी पाच वर्षात या मावळ तालुक्यातील जनतेसाठी काय विकास कामे केली आहेत, पुढील पाच वर्षे त्यांचे काय व्हिजन आहे या सर्व गोष्टी मतदार राजाला माहिती असल्यामुळे मावळ तालुक्यातील मतदार हा सुनील शेळके यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’