Dainik Maval News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मावळ तालुक्यातील मयुरी यशवंत जांभुळकर (भेगडे-पाटील) हिने दैदिप्यमान यश मिळविले असून तिची गटविकास अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. मयुरीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मयुरीचे प्राथमिक शिक्षण तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे झाले. तिने पुढील शिक्षण डी.फार्मसी पुण्यामध्ये केले. पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. अथक प्रयत्नांतून मागील वर्षी तिची तलाठी म्हणून निवड झाली. त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला, यावेळी ती एमपीएससी परीक्षा पास होऊन गटविकास अधिकारी बनली आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यात कौतुक होत आहे.
मयुरीचा जन्म एका शेतकरी कुटुंबातील असून वडील यशवंत जांभुळकर हे आजही काळ्या आईची सेवा करीत आहेत. तर, आई मंदा वहिले या नोकरी करीत आहेत. मयुरीचे आई वडील दोघेही दोघेही राष्ट्रीय खेळाडू राहिलेत, यशवंत जांभुळकर हे कबड्डी आणि वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळेत. तर, मंदा जांभुळकर (वहिले) या अथलेटिक्स मध्ये रनिंग विभागात राष्ट्रीय खेळाडू म्हणून परिचित होत्या.
- मयुरीच्या आई या वडगाव मावळ येथील वहिले कुटुंबातील असून मयुरी या लग्नानंतर तळेगावच्या भेगडे-पाटील कुटुंबाच्या सून बनल्या आहेत. तालुक्याची लेक आज गटविकास अधिकारी बनल्याचा अत्यंत आनंद झाला असल्याचे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विशाल वहिले यांनी दै. मावळशी बोलताना सांगितले.
अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne