शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे ( Meenatai Thackeray ) यांची 6 जानेवारी रोजी जयंती असते. त्यांची जयंती राज्यभरातील शिवसैनिक ममता दिन ( Mamata Din ) म्हणून साजरा करतात. यंदा मीनाताई ठाकरे यांच्या 92 व्या जयंतीदिनी मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) शिवसैनिकांकडून लोणावळा ( Lonavla City ) येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) गटाच्या शिवसैनिकांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. लोणावळा शहर संपर्क कार्यालयात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटिका शादान चौधरी, शिवसेना (उ.बा.ठा.) मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी शहर संघटिका माजी नगरसेविका कल्पना आखाडे, जयवंत दळवी, संजय भोईर, संगीता कंधारे, नरेश काळवीट, प्रतिभा कालेकर, प्रमुख विजय आखाडे, संतोष गिरी, जितेंद्र ठोंबरे, संजय जाधव, धनंजय साळुंखे, शक्ती कुमावत आदी शिवसैनिक उपस्थित होते. ( Meenatai Thackeray 92nd Birth Anniversary Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Lonavla Maval )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार
– बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ