पुणे – लोणावळा सेक्शनवर आज, रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजिनिअरिंग आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, अशी विनंती प्रवाशांना करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे ;
1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
3. पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
4. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
5. पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
6. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.
डाऊन उपनगरीय गाड्या रद्द ;
1. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.
2. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
3. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.
4. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
5. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.
6. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील. ( Mega Block on Pune Lonavla section Railway Route today Sunday 7th January )
अधिक वाचा –
– शरद मोहोळ हत्या प्रकरण : ‘पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?’ वाचा पोलिसांनी दिलेली माहिती
– ‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election